केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये क्रीडा आणि शारीरिक शिक्षण
केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये क्रीडा आणि शारीरिक शिक्षण केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये क्रीडा आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रासाठी विविध योजनांद्वारे निधीची वाढ करण्यात आली आहे. ' खेलो इंडिया ' कार्यक्रमासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे , जी मागील वर्षाच्या 800 कोटी रुपयांच्या तुलनेत 200 कोटी रुपयांनी अधिक आहे ' खेलो इंडिया ' हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे , जो देशातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सुरू करण्यात आला आहे , या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे युवा खेळाडू घडवणे – देशभरातील युवा क्रीडा प्रतिभांना ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण , मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देणे. क्रीडा संस्कृतीला चालना देणे – भारतातील प्रत्येक शाळा , महाविद्यालय , गाव आणि शहरांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे आणि अधिकाधिक लोकांना खेळाकडे वळवणे. ग्रामिण आणि शहरी भागातील खेळाडूंना संधी – दुर्गम आणि ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभांना हक्काची संधी उपलब्ध करून देणे. क्रीडा पायाभूत सुविधा सुधारणे – राज्य आ...