स्टिरॉइड ऑलिंपिक
थिएलच्या स्टिरॉइड ऑलिंपिक
PayPal (एक अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय
तंत्रज्ञान कंपनी आहे जी जगभरातील ग्राहकांना आणि व्यवसायांना ऑनलाइन पेमेंट सेवा
प्रदान करते) चे अब्जाधीश सह-संस्थापक पीटर थिएल, "एन्हांस्ड
गेम्स / वर्धित खेळ" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपक्रमाचे समर्थन करत आहेत, ज्याला कार्यक्षमतेत वाढ करणाऱ्या
औषधांबद्दलच्या भूमिकेमुळे "स्टेरॉइड ऑलिंपिक" म्हणून
संबोधले जात आहे.
वर्धित खेळ ही एक खाजगीरित्या अनुदानीत
क्रीडा स्पर्धा आहे जी स्वतःचे "भविष्यातील ऑलिंपिक" म्हणून वर्णन करते.
वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा स्वीकार करणारा क्रीडा स्पर्धा तयार
करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
द एन्हांस्ड गेम्स ही डॉ. एरॉन डिसोझा
यांची बुद्धी उपज आहे,
ज्यांनी पूर्वी गॉकर मीडिया
विरुद्धच्या खटल्यात थिएलसोबत काम केले होते. इतर गुंतवणूकदारांमध्ये ख्रिश्चन अँगरमायरचा
एपिरॉन इन्व्हेस्टमेंट ग्रुप आणि कॉइनबेसचे माजी सीटीओ बालाजी श्रीनिवासन यांचा
समावेश आहे.
एन्हांस्ड गेम्स/वर्धित खेळ ऍथलीट्सना कार्यक्षमता
वाढवणारी औषधे वापरण्यासाठी सक्रियपणे प्रोत्साहित करतात. वर्धित खेळ ही एक ऑलिम्पिक शैलीची
स्पर्धा आहे जिथे खेळाडू कामगिरी वाढवणारी औषधे घेऊ शकतात. वर्धित खेळ ही "औषध चाचणीशिवाय
जगातील पहिली क्रीडा स्पर्धा" असेल. ज्यामुळे
काही मोठे नैतिक आणि संरक्षणात्मक प्रश्न उपस्थित होतील.
वर्धित खेळांमध्ये,
"शेकडो" स्पर्धक ॲनाबॉलिक
स्टिरॉइड्सपासून ते ग्रोथ हार्मोन्स आणि टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीपर्यंत
कोणतेही कार्यप्रदर्शन वाढवणारे पदार्थ घेण्यास सक्षम असतील.
स्पर्धेच्या वेबसाइटने डोपिंग
घोटाळ्यांमध्ये सहभागी असलेल्यांची "शूर खेळाडू" असे संबोधून प्रशंसा
केली आहे, ऑलिम्पिक मध्ये
स्टिरॉइड बंदी म्हणजे "वैज्ञानिक
नवकल्पना रोखणे" अशी म्हणून टीका केली आहे आणि बॉडीबिल्डर्समध्ये स्टिरॉइड
वापराच्या वाढत्या दरांना "चळवळ" म्हटले आहे.
डिसूझा यांना "अल्प काळ लक्ष
देण्या-या युगासाठी अर्थात TikTok पिढीसाठी" ऑलिम्पिक खेळ तयार करायचे आहेत. डिसोझा म्हणतात, “आमचे मुख्य लक्ष जागतिक विक्रम मोडणे
आहे. “आम्हाला फक्त
असे खेळाडू हवे आहेत ज्यांच्याकडे खरोखर महत्त्वाच्या खेळांमध्ये जागतिक विक्रम
मोडण्याची क्षमता आहे.
वर्धित खेळांवर विविध स्तरातून टीका
होत आहे. समीक्षकांचा असा युक्तिवाद आहे की या उपक्रमामुळे खेळाडूंचे आरोग्य
धोक्यात येते आणि खेळाची अखंडता कमी होते. युनायटेड स्टेट्स अँटी-डोपिंग एजन्सी
(यूएसएडीए) चे सीईओ ट्रॅव्हिस टायगार्ट यांनी या कल्पनेचा उल्लेख “हास्यजनक” म्हणून केला आणि हा “खरा
खेळ नव्हे तर धोकादायक जोकर शो” आहे असे ते म्हणतात. जागतिक ऍथलेटिक्सचे
प्रमुख लॉर्ड सेबॅस्टियन को यांनी सांगितले की ऍथलेटिक्समधील कोणीही वर्धित
खेळांना गांभीर्याने घेत नाही.
टीका असूनही, वर्धित
खेळांनी ९०० ऍथलीट्सकडून
स्वारस्य आकर्षित केले आहे. पहिली स्पर्धा २०२५च्या उन्हाळ्यात
होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment