राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, भाग २: उच्च शिक्षण प्रकरण १५: शिक्षक शिक्षण
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, भाग २: उच्च शिक्षण
प्रकरण १५: शिक्षक शिक्षण
PART
II: HIGHER EDUCATION, Chapter 15: Teacher Education
15.1. Teacher education
is vital in creating a pool of schoolteachers that will shape the next
generation. Teacher preparation is an activity that requires
multidisciplinary perspectives and knowledge, formation of dispositions and
values, and development of practice under the best mentors. Teachers must be
grounded in Indian values, languages, knowledge, ethos, and traditions
including tribal traditions, while also being well-versed in the latest
advances in education and pedagogy. |
१५.१ पुढील
पिढीला आकार देणारे शालेय शिक्षक तयार करण्यात शिक्षकांचे शिक्षण महत्त्वपूर्ण
आहे. शिक्षक तयारी ही एक क्रिया आहे ज्यासाठी बहु-अनुशासनात्मक दृष्टीकोन, आणि ज्ञान, तसेच स्वभाव व मूल्ये
तयार करणे आणि सर्वोत्तम गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मेहनत / अभ्यास / सराव विकास आवश्यक आहे.
शिक्षकांना भारतीय मूल्ये, भाषा, ज्ञान, आचार आणि परंपरा (आदिवासींच्या परंपरेसह) यांशी घट्ट नाते
असायला पाहिजे. तसेच शिक्षण आणि अध्यापनशास्त्रातील ताज्या प्रगतीतही ते निपुण /
परिपूर्ण असायला पाहिजे. |
15.2. According to the
Justice J. S. Verma Commission (2012) constituted by the Supreme Court, a
majority of stand-alone TEIs - over 10,000 in number are not even attempting
serious teacher education but are essentially selling degrees for a price.
Regulatory efforts so far have neither been able to curb the malpractices in
the system, nor enforce basic standards for quality, and in fact have had the
negative effect of curbing the growth of excellence and innovation in the
sector. The sector and its regulatory system are, therefore, in urgent need
of revitalization through radical action, in order to raise standards and
restore integrity, credibility, efficacy, and high quality to the teacher
education system. |
१५.२ सुप्रीम
कोर्टाद्वारे गठित न्यायमूर्ती जे. एस. वर्मा कमिशन (२०१२) नुसार, बहुतेक १०००० हून अधिक
स्टँड-अलोन शिक्षक शिक्षण संस्था (टीईआय) गंभीर शिक्षक शिक्षण देण्याचा
प्रयत्नही करीत नाहीत परंतु मूलत: किंमतीला पदवी / डिग्री विकत आहेत. नियामक
प्रयत्नांमुळे आतापर्यंत यंत्रणेतील गैरप्रकारांना आळा घालता आला नाही, तसेच गुणवत्तेसाठी
मूलभूत मानकांची अंमलबजावणी होऊ शकली नाही आणि खरं तर या क्षेत्रातील उत्कृष्टता
आणि नाविन्यपूर्णतेच्या वाढीस प्रतिबंध करण्याचा नकारात्मक परिणाम झाला आहे
म्हणूनच शिक्षक शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता मानके वाढवण्याची व अखंडता, विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि उच्च
गुणवत्ता पुनर्संचयित करण्यासाठी हे क्षेत्र आणि त्याची नियामक यंत्रणा यांचे
मूलगामी क्रियेद्वारे पुनरुज्जीवन करण्याची त्वरित गरज आहे. |
15.3. In order to
improve and reach the levels of integrity and credibility required to restore
the prestige of the teaching profession, the Regulatory System shall be
empowered to take stringent action against substandard and dysfunctional
teacher education institutions (TEIs) that do not meet basic educational
criteria, after giving one year for remedy of the breaches. By 2030, only
educationally sound, multidisciplinary, and integrated teacher education
programmes shall be in force. |
१५.३ प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेच्या पातळीत सुधारणा आणि तेथे पोहोचण्यासाठी अध्यापन व्यवसायाची प्रतिष्ठा पुनर्संचयित करणे आवश्यक आहे, उल्लंघनावर उपाय म्हणून एक वर्ष दिल्यानंतर मूलभूत शैक्षणिक निकषांची पूर्तता न करणा-या निम्न दर्जाच्या आणि अकार्यक्षम शिक्षक शिक्षण संस्थांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे नियामक यंत्रणास अधिकार देण्यात येईल. सन २०३० पर्यंत केवळ शैक्षणिकदृष्ट्या उत्तम, बहु-अनुशासनात्मक आणि एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम लागू होतील. |
15.4. As teacher
education requires multidisciplinary inputs, and education in high-quality
content as well as pedagogy, all teacher education programmes must be
conducted within composite multidisciplinary institutions. To this end, all
multidisciplinary universities and colleges - will aim to establish,
education departments which, besides carrying out cutting-edge research in
various aspects of education, will also run B.Ed. programmes, in
collaboration with other departments such as psychology, philosophy,
sociology, neuroscience, Indian languages, arts, music, history, literature,
physical education, science and mathematics. Moreover, all stand-alone TEIs
will be required to convert to multidisciplinary institutions by 2030, since
they will have to offer the 4-year integrated teacher preparation programme. |
१५.४ शिक्षक
शिक्षणासाठी बहु-विषयाची माहिती आणि उच्च-गुणवत्तेचा आशय तसेच अध्यापनशास्त्र
आवश्यक असल्याने सर्व शिक्षक-शिक्षणाचे कार्यक्रम संयुक्त बहु-अनुशासनिक
संस्थांमध्ये आयोजित केले जाणे आवश्यक आहे. यासाठी, सर्व बहु-विद्याशाखेची
विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी शिक्षण विभाग स्थापन करण्याचे उद्दीष्ट ठेवलेले
आहे, जे शिक्षणाच्या विविध बाबींमध्ये अत्याधुनिक संशोधन
करण्याबरोबरच मानसशास्त्र, तत्वज्ञान, समाजशास्त्र, न्यूरोसायन्स, भारतीय भाषा, कला, संगीत, इतिहास, साहित्य, शारीरिक शिक्षण, विज्ञान आणि गणित
यासारख्या इतर विभागांच्या सहकार्याने बी.एड.अभ्यासक्रम सुद्धा चालवतील. शिवाय, सर्व स्वतंत्र शिक्षक
शिक्षण संस्थां २०३० पर्यंत
बहु-शाखात्मक संस्थांमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे, कारण त्यांना ४-वर्षांचे एकात्मिक शिक्षक
तयारी अभ्यासक्रम सुरू करावे लागतील. |
15.5. The 4-year
integrated B.Ed. offered by such multidisciplinary HEIs will, by 2030, become
the minimal degree qualification for school teachers. The 4-year integrated
B.Ed. will be a dual-major holistic Bachelor’s degree, in Education as well as a
specialized subject such as a language, history, music, mathematics, computer
science, chemistry, economics, art, physical education, etc. Beyond the
teaching of cutting-edge pedagogy, the teacher education will include
grounding in sociology, history, science, psychology, early childhood care
and education, foundational literacy and numeracy, knowledge of India and its
values/ethos/art/traditions, and more. The HEI offering the 4-year integrated
B.Ed. may also run a 2-year B.Ed., for students who have already received a
Bachelor’s
degree in a specialized subject. A 1-year B.Ed. may also be offered for
candidates who have received a 4-year undergraduate degree in a specialized
subject. Scholarships for meritorious students will be established for the
purpose of attracting outstanding candidates to the 4-year, 2-year, and
1-year B.Ed. programmes. |
१५.५ अशा बहु-अनुशासकीय/ विद्याशाखीय (मल्टी-डिसीप्लीनरी) उच्च शिक्षण संस्थांनी दिलेली ४-वर्षांचे एकात्मिक बीएड (फोर इयर इंटिग्रेटेड बीएड.) 2030 पर्यंत शालेय शिक्षकांसाठी किमान पदवी पात्रता होईल. फोर इयर इंटिग्रेटेड बीएड. ही शिक्षणात, तसेच भाषा, इतिहास, संगीत, गणित, संगणक विज्ञान, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, कला, शारीरिक शिक्षण इ. सारख्या विशिष्ट / विशेष विषयात संयुक्त (ड्युअल)प्रमुख समग्र बॅचलर पदवी असेल. अत्याधुनिक अध्यापनशास्त्राच्या शिक्षणापलीकडे शिक्षक शिक्षणामध्ये समाजशास्त्र, इतिहास, विज्ञान, मानसशास्त्र, लवकर बालपण काळजी आणि शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि अंक, भारताचे ज्ञान आणि तिची मूल्ये / नीति / कला / परंपरा आणि बरेच काही समाविष्ट आहे. ४-वर्षांचा एकात्मिक बीएड. अभ्यासक्रम देणा-या उच्च शिक्षण संस्था ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच एखाद्या विशेष विषयात पदवी प्राप्त केली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी २ वर्षाचा बीएड अभ्यासक्रम देखील चालवू शकते. १ वर्षाचा बीएड अभ्यासक्रम विशेष विषयात ४-वर्षाची पदवी प्राप्त केलेल्या पदवीधर उमेदवारांना देखील उपलब्ध केला जाऊ शकतो. |
15.6. HEIs offering
teacher education programmes will ensure the availability of a range of
experts in education and related disciplines as well as specialized subjects.
Each higher education institution will have a network of government and
private schools to work closely with, where potential teachers will
student-teach along with participating in other activities such as community
service, adult and vocational education, etc. |
१५.६ शिक्षक
शिक्षण अभ्यासक्रम कार्यक्रम
राबविण-या उच्च शिक्षण संस्था शिक्षण
आणि संबंधित विषयांमध्ये तसेच विशेष विषयातील तज्ञांची उपलब्धता सुनिश्चित
करतील. प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेकडे लक्षपूर्वक काम करण्यासाठी सरकारी आणि
खाजगी शाळांचे जाळे असेल, जिथे संभाव्य शिक्षक विद्यार्थी-शिक्षण तसेच समाजसेवा, प्रौढ आणि व्यावसायिक
शिक्षण इत्यादी उपक्रमांमध्ये भाग घेतील. |
15.7. In order to
maintain uniform standards for teacher education, the admission to
pre-service teacher preparation programmes shall be through suitable subject
and aptitude tests conducted by the National Testing Agency, and shall be
standardized keeping in view the linguistic and cultural diversity of the
country. |
१५.७ शिक्षक
शिक्षणात एकसमान निकष राखण्यासाठी, सेवा-पूर्व शिक्षक
तयारी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश योग्य विषय आणि राष्ट्रीय चाचणी संस्था आयोजित
योग्यता / कल चाचणीद्वारे केले जातील. देशातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधता
लक्षात घेऊन प्रमाणित केले जाईल. |
15.8. The faculty
profile in Departments of Education will necessarily aim to be diverse and
but teaching/field/research experience will be highly valued. Faculty with
training in areas of social sciences that are directly relevant to school
education e.g., psychology, child development, linguistics, sociology,
philosophy, economics, and political science as well as from science
education, mathematics education, social science education, and language
education programmes will be attracted and retained in teacher education
institutions, to strengthen multidisciplinary education of teachers and
provide rigour in conceptual development. |
१५.८ शिक्षण विभागातील प्राध्यापकांचे प्रोफाइल विविधतेचे असणे आवश्यक आहे परंतु अध्यापन / क्षेत्र / संशोधन अनुभवाचे फार महत्त्व असेल. शालेय शिक्षणाशी थेट संबंधित असलेल्या सामाजिक शास्त्राच्या क्षेत्रातील प्रशिक्षण असलेले प्राध्यापक उदा. मानसशास्त्र, बालविकास, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र तसेच विज्ञान शिक्षण, गणित शिक्षण, सामाजिक विज्ञान शिक्षण आणि भाषा शिक्षण अभ्यासक्रम शिक्षकांचे बहु-अनुशासनिक शिक्षण बळकट करण्यासाठी आणि अविचलित वैचारिक विकासासाठी शिक्षक शिक्षण संस्थांमध्ये आकर्षित केले जतील आणि टिकवून ठेवले जातील. |
15.9.
All fresh Ph.D. entrants, irrespective of discipline, will be required to
take credit-based courses in teaching/education/pedagogy/writing related to
their chosen Ph.D subject during their doctoral training period. Exposure to
pedagogical practices, designing curriculum, credible evaluation systems,
communication, and so on will be ensured since many research scholars will go
on to become faculty or public representatives / communicators of their
chosen disciplines. Ph.D students will also have a minimum number of hours of
actual teaching experience gathered through teaching assistantships and other
means. Ph.D. programmes at universities around the country will be
re-oriented for this purpose.
|
१५.९ सर्व नवीन
पीएच.डी. प्रवेश घेतलेल्यांनी
विद्याशाखा विचारात न घेता, त्यांच्या डॉक्टरेट
प्रशिक्षण कालावधीत निवडलेल्या पीएच.डी. विषयाशी संबंधित अध्यापन/ शिक्षण/
शिक्षणशास्त्र / लेखन यामध्ये क्रेडीट-आधारित अभ्यासक्रम घेणे आवश्यक आहे.
अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा सराव, अभ्यासक्रम तयार करणे, विश्वासार्ह मूल्यांकन
प्रणाली, संप्रेषण इत्यादींचा अभ्यास करणे सुनिश्चित केले जाईल
कारण बरेच संशोधन विद्वान त्यांच्या निवडलेल्या विषयांचे प्राध्यापक किंवा
लोकप्रतिनिधी / संप्रेषक बनतील. पीएच.डी. विद्यार्थ्यांकडे अध्यापन सहाय्यकत्व
आणि इतर माध्यमांद्वारे एकत्रित वास्तविक शिक्षणाचा किमान तासांचा अनुभव देखील
असेल. या उद्देशाने देशभरातील
विद्यापीठांमधील पीएच.डी.कार्यक्रमांना पुन्हा दिशा देण्यात येईल. |
15.10. In-service
continuous professional development for college and university teachers will
continue through the existing institutional arrangements and ongoing
initiatives; these will be strengthened and substantially expanded to meet
the needs of enriched teaching-learning processes for quality education. The
use of technology platforms such as SWAYAM/DIKSHA for online training of
teachers will be encouraged, so that standardized training programmes can be
administered to large numbers of teachers within a short span of time. |
१५.१० विद्यमान संस्थागत व्यवस्था आणि चालू असलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील शिक्षकांसाठी सेवांतर्गत सतत व्यावसायिक विकास चालू राहील; दर्जेदार शिक्षणासाठी समृद्ध अध्ययन- अध्यापन प्रक्रियेची गरजा भागविण्यासाठी या गोष्टी मजबूत आणि मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येतील. शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी स्वयम / दिक्षा या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल, जेणेकरून प्रमाणित प्रशिक्षण कार्यक्रम अल्प कालावधीत मोठ्या संख्येने शिक्षकांना देता येतील. |
15.11. A National Mission for
Mentoring shall be established, with a large pool of outstanding
senior/retired faculty – including those with the ability to teach in Indian
languages – who would be willing to provide short and long-term
mentoring/professional support to university/college teachers. |
१५.११
मार्गदर्शनासाठी (मेन्तोरिंग) राष्ट्रीय मिशन स्थापन केले जाईल, विद्यापीठ /
महाविद्यालयीन शिक्षकांना अल्प आणि दीर्घकालीन मार्गदर्शन / व्यावसायिक सहाय्य
देण्यास तयार असेलेल्या उत्तम वरिष्ठ / सेवानिवृत्त प्राध्यापकांचा स्वतंत्र चमू
तयार केला जाईल यात भारतीय भाषांमध्ये शिकवण्याची क्षमता असलेल्यांचा समावेश
असेल. |
संदर्भ :
https://www.ugc.ac.in/pdfnews/4369921_NEP_Final_English.pdf पृ.क्र. ४२-४३
https://www.ugc.ac.in/pdfnews/4624329_NEP_final_HINDI.pdf पृ.क्र. ६७-७०
मराठी रुपांतर
सोपान एकनाथ कांगणे
महाराष्ट्रीय मंडळाचे, चंद्रशेखरआगाशे
शारीरिक शिक्षणमहाविद्यालय, गुलटेकडी, पुणे
Comments
Post a Comment